पोस्टमन, डाकसेवकांच्या समस्या केंद्राकडे मांडणार : महाडिक
By Admin | Updated: November 9, 2015 00:38 IST2015-11-09T00:37:49+5:302015-11-09T00:38:26+5:30
नॅशनल युनियन पोस्टल एम्प्लॉईजचे अधिवेशन

पोस्टमन, डाकसेवकांच्या समस्या केंद्राकडे मांडणार : महाडिक
नाशिक : वाढते शहरीकरण आणि पोस्टल बॅँकिंग यामुळे पोस्टमन, ग्रामीण डाकसेवक व तृतीय वर्गातील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा थेट केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन तृतीय वर्गाचे राज्याचे मंडळ अध्यक्ष विलास महाडिक यांनी केले.
नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन व ग्रुप डीएमटीएसच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित १७ व्या द्वैवार्षिक अधिवेशनप्रसंगी महाडिक
प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ज्याप्रमाणे शहरी भागात कार्यरत असणाऱ्या पोस्टमनच्या समस्या आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण डाक सेवकांच्याही ज्वलंत समस्या आहेत. त्यांच्या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रस्तरावर जनरल मुख्य पोस्टमास्तरांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.
विभागात पोस्टमन व ग्रुप डीच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भातही शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरी भागांमध्ये कोअर पोस्टल बॅँकिंग सेवेमुळे नागरिकांना उत्कृष्ट बॅँकिंग सेवा उपलब्ध व्हावी आणि कर्मचाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय टाळली जावी, यासाठी सर्वच डाकघरांमध्ये अद्ययावत संगणकीकृत तंत्रज्ञान असणे गरजेचे असल्याचे महाडिक म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर आर्यन गाडगीळ, रामनाथ म्हस्के, सुखदेव फरताळे, राजेंद्र शिंदे, बहिरू जाधव, आशुतोष देशपांडे, कुलदीप खर्डे, सुरेश आमराळे आदि मान्यवर
उपस्थित होते. दरम्यान, मागील
सभेचा अहवाल वाचून कायम करण्यात आला. ताळेबंद खर्चाला मंजुरी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पोस्टल कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)