टपाल खात्यात आता जेमतेम शंभरच खाती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:15 IST2017-11-14T01:14:04+5:302017-11-14T01:15:59+5:30
नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी तोबा गर्दी केली. खाते उघडण्यासाठी तब्बल पाच दिवस टपाल कर्मचाºयांना जादा काम करावे लागले.

टपाल खात्यात आता जेमतेम शंभरच खाती सुरू
नाशिक : नोटाबंदीनंतरच्या काळात काळ्या पैशातून दारिद्र्यरेषेखालील खातेदारांच्या बॅँक आणि टपाल खात्यात पैसे जमा होणार असल्याची घोषणा झाली आणि टपाल खात्यात सेव्हिंग खाते उघडण्यासाठी रांगच लागली होती. फक्त ५० रुपये भरून पोस्टात खाते उघडता येत असल्याने नागरिकांनी तोबा गर्दी केली. खाते उघडण्यासाठी तब्बल पाच दिवस टपाल कर्मचाºयांना जादा काम करावे लागले. जादा खिडक्या सुरू करून सेव्हिंग खाते उघडण्यात आले. केवळ आठवडाभरात सुमारे १३०० पेक्षा जास्त बचत खाती उघडण्यात आली. मात्र त्यानंतर कोणाच्याही खात्यात पाच पैसेही जमा झाले नाही. त्यामुळे नोटाबंदी काळात उघडण्यात आलेली सुमारे ९० टक्के खाती बंद आहेत. या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार आजवर झालेला नाही. जेमतेम शंभर ते दीडशे खाती सुरू असून, त्यातही १००० ते २००० पेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकलेली नाही. असे असले तरी पोस्टाला मात्र ५० रुपये याप्रमाणे किरकोळ प्रमाणात उत्पन्न झाले. उत्पन्न मिळविणे हा टपाल खात्याचा उद्देश नसला, तरी सेवा देण्यासाठी या काळात कर्मचाºयांना खूपच धावपळ करावी लागली. या काळात फार मोठ्या ठेवी वाढल्या नाहीत किंवा कोणत्याही योजनेतही पैसे गुंतविण्यात आले नाहीत. याउलट टपाल खात्यामध्ये पैसे जमा असलेल्यांनी ठेवी काढून घेतल्या.
नोटाबंदीची वर्षपूर्ती !
पैसे सरकारजमा होण्याची किंवा पैसे काढण्यावर निर्बंध येण्याच्या भीतीने खातेदारांनी अगोदरच पैसे काढून घेतले. खातेदारांच्या सर्व खात्यांची चौकशी होणार असल्याची आणि सर्व माहिती द्यावी लागणार असल्याची चर्चा पसरल्याने खातेधारकांनी टपालातील ठेवी कमी केल्या. त्याचा काहीसा फटका मात्र टपाल खात्याला बसला.