ग्रामीण भागातील डाक कार्यालये कात टाकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:23+5:302021-09-24T04:16:23+5:30

सिन्नर: १ एप्रिल १८५४ ला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या भारतीय डाक विभागाने काळाच्या ओघात बदल करण्यास प्रारंभ केला आहे. ...

Post offices in rural areas began to shrink | ग्रामीण भागातील डाक कार्यालये कात टाकू लागली

ग्रामीण भागातील डाक कार्यालये कात टाकू लागली

सिन्नर: १ एप्रिल १८५४ ला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या भारतीय डाक विभागाने काळाच्या ओघात बदल करण्यास प्रारंभ केला आहे. १६७ वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या या विभागाने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.

इंग्रजांच्या काळात स्थापन झाल्यानंतर डाक विभागाने दळणवळण क्षेत्रात प्रगती साधली. ग्रामीण भागात दऱ्याखोऱ्यात टपाल पोहोचविण्यासह परदेशातही खुशालीचे संदेश देण्याचे काम डाक विभागाने १६७ वर्षे इमानेइतबारे पार पाडले. काळाच्या ओघात बदल झाले. पत्रांची जागा मोबाईलच्या मेसेज व ई-मेलने घेतली. तार केव्हाच बंद पडली. मनी ऑर्डरची जागा फोन पे किंवा गुुगल पे यांनी घेतली. असे असले तरी डाक विभागाचे महत्त्व कमी झाले नाही. डाक विभागानेही काळाच्या बदलानुरूप स्वत:मध्ये बदल करीत जनतेच्या सेवेची नाळ जोडून ठेवली.

डाक विभागाने जनतेसोबत नाते अधिक घट्ट करण्यासाठी विविध उपक्रम व योजना सुरू केल्या आहेत. त्याचा नागरिकांकडूनही प्रतिसाद लाभत आहे. समृद्धी सुकन्या योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक, भारतीय ग्रामीण डाक विमा योजना, मोबाईल आधार अपडेट, स्पीड पोस्ट, इतर बँकांचे पैसे घरबसल्या काढून देणे (एईपीएस), वीज बिल, फोन बिल भरणा, विविध कर भरणे, एनईएफटी, आर. टी. जी. एस., आदींसह विविध उपक्रम व योजना सुरू करून डाक विभागाने आपली छाप कायम ठेवली आहे.

--------------------

ग्रामीण टपाल जीवन विमा क्षेत्रात उल्लेखनीय काम

ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्पन्नाच्या मानाने त्यांना परवडेल असा स्वस्तात ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) काढून देण्याची मोहीम भारतीय डाक विभागाच्या नाशिक विभागाने विशेष करून सुरू केली आहे. यानिमित्ताने २२ सप्टेंबर रोजी महालॉगीन डे साजरा करण्यात आल्याची माहिती पश्चिम उपविभागाचे सहायक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. या महालॉगीन डे च्या दिवशी पश्चिम उपविभागाने एकाच दिवशी तब्बल ११६ प्रस्ताव बनवून सुमारे अडीच लाख रुपयांचा प्रीमियम जमा केला. यात विजय तांबे (गोंदे), मदन परदेशी (भोजापूर) व अमोल शिंदे (सायखेडा) यांनी उल्लेखनीय काम करीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

(२३ पाेस्ट १)

230921\23nsk_24_23092021_13.jpg

२३ इंडियन पोस्ट १

Web Title: Post offices in rural areas began to shrink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.