शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून गैरप्रकाराची शक्यता

By श्याम बागुल | Updated: March 4, 2019 18:43 IST

येत्या ७ ते ८ मार्च रोजी निवडणूक तारखा घोषित होतील व येत्या तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आजवर झालेल्या निवडणुकांचा विचार करता ही निवडणूक ख-या अर्थाने परिवर्तन घडविणारी असून, निवडणूक यंत्रणेवर आपली शंका नाही, मात्र केंद्र व राज्य सरकाराच्या भूमिकेबाबत आत्तापासून संशय येऊ लागला

ठळक मुद्देशरद पवार यांना भीती : मेळाव्याद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद मतदान सुरू होण्यापूर्वी ज मतदान यंत्रे व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घ्या

नाशिक : चार राज्यांतील निवडणूक निकालामुळे देशातील जनतेचा कल देशातील सत्ताधाऱ्यांना कळून चुकला असून, येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे, त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जाण्याची व निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीती व्यक्त करून राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले मोदी ही देशापुढील राष्टÑीय आपत्ती असल्याची घणाघाती टीका केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. पवार पुढे म्हणाले, येत्या ७ ते ८ मार्च रोजी निवडणूक तारखा घोषित होतील व येत्या तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आजवर झालेल्या निवडणुकांचा विचार करता ही निवडणूक खºया अर्थाने परिवर्तन घडविणारी असून, निवडणूक यंत्रणेवर आपली शंका नाही, मात्र केंद्र व राज्य सरकाराच्या भूमिकेबाबत आत्तापासून संशय येऊ लागला असल्याचा आरोप केला. या आरोपाच्या प्रीत्यर्थ पवार यांनी भंडारा येथील पोटनिवडणूक व मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात झालेल्या घोळाचा उल्लेख करून, सध्या ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना चार राज्यांतील निवडणुकीमुळे जनतेचा कल लक्षात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीतही सत्तेचा गैरउपयोग होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी जाऊन मतदान यंत्रे व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना केली. देशासाठी त्याग, शौर्य व सर्वस्वीपणाला लावणाºयांचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्र भारतीय जनता पक्षाने सुरू केला असल्याचा आरोप करून पवार यांनी पुलवामा घटनेनंतर सर्वच विरोधी पक्षप्रमुखांची सरकारने बैठक बोलविली त्यावेळी साºयांनीच युद्धजन्य परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला व सैन्यदलाला मोकळीक देण्यात आली. त्यानंतर सैन्याने आपली शौर्यता जगाला दाखवून दिली. परंतु या घटनेचे भाजपाने भांडवल करून गावोगावी झेंडे नाचवायला सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले आणि छाती कोण बडवतो? असा सवाल यांनी केला.सत्तेत असताना साडेचार वर्षांत नोटबंदी करून काळापैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले, रोजगार निर्मिती, शेतमालाला दीडपट हमीभाव असे अनेक आश्वासने सरकारने दिले, परंतु यापैकी काहीच झाले नाही, भ्रष्टाचार बंद करणार होते, तर राफेलच्या निमित्ताने तोदेखील उघड झाला, हमीभाव शेतकºयांना मिळाला नाही, कर्जमाफी न देता, शेतकºयांना दररोज १७ रुपये देऊन त्यांची कुुचेष्टा केली असल्याची टीका करून शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या माजी पंतप्रधानांना बेईज्जत करण्यासाठी एका घराण्यावर खालच्या भाषेत टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याच घराण्याने देशाचा इतिहासच नव्हे तर भुगोल बदलण्याची ताकद ठेवतानाच दोन पंतप्रधान देशसेवेसाठी बलिदान केल्याचा त्यांना विसर पडला आहे. यातून मोदी यांची संकुचित विचारसरणी दिसून येत असून, जर देशाच्या पंतप्रधानांचे विचार संकुचित असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही, अशी भीती व्यक्त केली. देशाचे भवितव्याचा विचार करून सर्व विरोधी पक्ष त्यासाठीच एकत्र येत असून, सध्याच्या सरकारकडेच पुढची पाच वर्षे सत्ता दिल्यास देशातील जनतेला लोकशाहीचा अधिकार राहणार नाही व हुकूमशाहीचा उदय होईल. त्यामुळे मोदी नावाची देशापुढील राष्ट्रीय आपत्ती निवडणुकीत घालवून देशाला मुक्त करा, असे आवाहनही शेवटी शरद पवार यांनी केले.चौकट====लबाडा घरचं आवतणंआपल्या भाषणात पवार यांनी कांद्याच्या प्रश्नाला हात घातला, त्याचवेळी एका शेतकºयाने उठून आपली व्यथा सांगायला सुरुवात केली व कांदा विक्रीचे अनुदान मिळाले नसल्याचे तसेच दोन हजार रुपये किसान योजनेचे खात्यात जमा करून पुन्हा काढून घेतल्याचे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी, कांदा व द्राक्षाला किंमत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही अशा वेळी ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार शेतकºयांसाठी निव्वळ योजनांची घोषणा करीत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही असे सांगून ‘लबाडा घरचं आवतण जेवल्याशिवाय खरं मानू नका’ असे आवाहनही त्यांनी केले.चौकट====लोक म्हणतात घोटाळा म्हणजे ‘राफेल’राफेल विमान खरेदीची सारी प्रकिया शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितली व ‘दाल मे गडबड’ वा ‘कुछ तो काला जरूर हैं’ असे म्हणून ग्रामपंचायतीत झालेल्या किरकोळ गैरप्रकारालाही आता लोक ‘राफेल’चा भ्रष्टाचार झाल्याचे म्हणू लागले असून, ज्यावेळी सामान्य माणूस जेव्हा साशंकता व्यक्त करतो, तेव्हा संरक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार झाला की काय, अशी शंका येऊ लागते असे मत व्यक्त केले.समीरमुळे आज जिवंत - छगन भुजबळकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मी तुरुंगात आजारी असताना समीर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच जीवंत राहू शकलो, असा गौप्यस्फोट केला, पण त्याचवेळी शरद पवार यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले तेव्हाच छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडला, असे सांगून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. देशाने आजवर अनेक लढाया लढल्या, परंतु त्याचा राजकीय अभिनिवेश दाखविला नाही, परंतु सैनिकांच्या मृत्यूचे व त्यांनी गाजविलेल्या शौर्याचे भांडवल भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा आरोप केला. पुलवामा घटनेच्या दिवशी मोदी व शहा राजकीय भाषणबाजीत गर्क असताना राहुल गांधी यांनी संकटाच्या काळात आपला पक्ष सरकारसोबत असल्याची घोषणा केली, तर प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द करून आपली राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविले, असे सांगून भाजपाच्या काळातच सर्वाधिक सैन्यावर हल्ले झाल्याचा आरोप केला.दत्तक नाशिकवर मुख्यमंत्र्यांनी कायम अन्यायच केल्याचे सांगून भुजबळ यांनी महाराष्टÑाचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घालणे, नाशिक-पुणे रेल्वे, बोटक्लब, कलाग्राम, स्मार्टसिटीची आदी कामे बंद केली, असा आरोप करून नाशिक दत्तक घेतले तर आॅक्सफर्ड इकॉनॉमीमध्ये आमच्या काळात १६व्या क्रमांकावर असलेले नाशिक आता नावदेखील घेतले जात नाही तर स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक खाली का घसरला? असा सवाल केला.प्रारंभी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, डॉ. अपूर्व हिरे, हिरामण खोसकर, अनिता भामरे, सुषमा पगारे, विष्णुपंत म्हैसधुणे, समिना मेमन, गजानन शेलार यांनीही मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, हेमंत टकले, माजीमंत्री प्रशांत हिरे, भगीरथ शिंदे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, बापू भुजबळ, कैलास कमोद, दिलीप खैरे, सुनील वाजे, संतोष सोनपसारे, दीपक वाघ, संजय खैरनार, शिवाजी सहाणे आदी उपस्थित होते.चौकट=====मग, कुलभूषण जाधव का सुटला नाही?विंग कमांडर अभिनंदन याची सुटका म्हणजे पाकची शरणागती व मोदींची मुत्सद्देगिरीचा डंका भाजपावाले पिटत आहेत, इमरान खान घाबरला, असे सांगितले जात आहे. जर इमरान खरोखरच तुम्हाला घाबरला असेल तर गेल्या दोन वर्षांपासून पाकच्या कैदेत असलेला कुलभूषण जाधव का सुटत नाही? असा सवाल करून भुजबळ यांनी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७१ मध्ये जिनिव्हा करारानुसार ९९ हजार पाकिस्तानी कैद्यांना पुन्हा पाकच्या हवाली केले होते याची आठवण करून दिली व या करारानुसारच विंग कमांडर अभिनंदनची सुटका झाल्याचे सांगून भाजपा फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका केली.चौकट===तेव्हा तुम्ही शाळेत होतातभुजबळ यांनी, मी जामिनावर बाहेर असल्याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आहे. परंतु ज्यावेळी मी १९८५ मध्ये मुंबईचा महापौर आणि आमदार होतो तेव्हा हे फडणवीस शाळेत असतील याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे सांगून आपला कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी जिवात जीव असेपर्यंत आपण बोलतच राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चौकट===आता वाघाने कमळीचा मुका का घेतलाआपल्या भाषणात भुजबळ यांनी शिवसेनेवरही टीका केली. ‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’ वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’ ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत? असा सवाल केला. सरकारमध्ये सर्व निर्णय एकमताने होत असतात त्यामुळे महाराष्टÑाचे जे काही वाईट झाले त्याला सरकारमध्ये सामील असलेली शिवसेना व उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस