शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ दिलासा मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:30 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाला नाही.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाला नाही. करवाढ जाचक पद्धतीने नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिलासा देणार असल्याचे संबंधितांना स्पष्ट केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुन्या मिळकतींसाठी केलेली करवाढ कमी करून सरसकट ती १८ टक्के करण्यात आली. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा केली. त्याचप्रमाणे मोकळ्या भूखंडावरदेखील करआकारणीच्या दरात वाढ झाल्याने शहरात आंदोलन पेटले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना तोडगा काढण्यासाठी एप्रिल महिन्यातच आदेश दिले होते.सर्व निर्णय महापौरांना सांगूनच..आयुक्त लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याची जोरदार टीका झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपण महापौरांशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावा केला. महापालिकेच्या कर्मचारी आत्महत्या प्रकरणी कर्मचारी आंदोलन पेटवले जात असल्याच्या विषयावर खुद्द आयुक्तांनीच लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवल्याचे समजते. संबंधित सेना नेत्यास बळजबरी बोलण्यास सांगितले गेले असे थेट आयुक्तांनी सांगितल्याचे समजते. यावरूनही बरीच भवती न भवती झाल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका