शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या कारचे आरसे चोरी करणारी जोडगोळी ताब्यात; २७ आरसे हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 15:02 IST

मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.

ठळक मुद्देचोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी

नाशिक : शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर ‘वॉच’ ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूंचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गंगापूररोडवरील रहिवासी फिर्यादी संदीप नागेश्वर भदाने (४५) यांच्या इनोव्हा क्रिस्टा कार त्यांनी एका हॉटेलसमोर उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचे दोन्ही बाजूंचे एकूण पाच आरसे तोडून लंपास केले होते. याप्रकरणी त्यांनी मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. खबऱ्यांचे जाळे तपासत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पोलिसांनी अशोकामार्गावरील दीप रेसिडेन्सीमध्ये राहणारा संशयित वसीम साबीर शेख (३०), पखालरोडवरील रॉयल कॉलनीमध्ये राहणारा जावेद शेख (२६, सनशाइन अपार्टमेंट) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबईनाका व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांत सहभाग असल्याची क बुली दिली. कारच्या पुढील बाजूच्या आरसे पॅनलसह एकूण २७ आरसे व एक इनोव्हा कार (एम.एच०४ डीएन ०२७१) जप्त केली आहे. मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcarकारtheftचोरीArrestअटक