शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 18:40 IST

महापालिकेत बॅँक व्यवस्थापकांची बैठक : कर्ज संलग्न व्याज अनुदानातून होणार घरकुलाची निर्मिती

ठळक मुद्देपरवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी महापालिकेकडे सुमारे दहा हजार अर्ज प्राप्तसबसिडी मिळविण्यासाठी हुडकोशी करारनामा करण्याच्या संबंधित बॅँकांच्या शाखाप्रमुखांना सूचना

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी महापालिकेकडे सुमारे दहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर दहा हजार लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील राष्टयीकृत व खासगी बॅँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सबसिडी मिळविण्यासाठी हुडकोशी करारनामा करण्याच्या सूचनाही महापालिकेने संबंधित बॅँकांच्या शाखाप्रमुखांना दिल्या आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने झोपडपट्टीनिहाय आणि मागणी सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचा ‘आहे तेथेच पुनर्विकास’ केला जाणार आहे. महापालिकेने या घटकांतर्गत शहरातील यापूर्वीच्या घरकुल योजनेत समाविष्ट नसलेल्या विभागनिहाय झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात ४५ हजार २४८ झोपडीधारकांची नोंद घेण्यात आलेली आहे. कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठीही लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. या घटकासाठी ९३२८ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. खासगी भागीदारीद्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करणे या घटकासाठी ३४ हजार ५४० अर्जदारांना पात्र ठरविण्यात आले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान उपलब्ध करून घेण्यासाठी प्राप्त २०४९ अर्जांपैकी ६११ अर्ज पात्र ठरले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुस-या घटकात कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती केली जाणार आहे. सदर घटकांची अंमलबजावणी ही बॅँका किंवा गृहनिर्माण वित्तीय संस्थांमार्फत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लीड बॅँक म्हणून महाराष्ट बॅँकेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बॅँकांकडून होणा-या वित्तीय पुरवठ्यावरच या घटकाची अंमलबजावणी शक्य असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील राष्टयीकृत आणि खासगी बॅँकांच्या ६० शाखा व्यवस्थापकांची नुकतीच बैठक घेतली. बॅँकांनी वित्तीय पुरवठा करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. बॅँकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळावा याकरिता आपल्या शाखांच्या दर्शनी भागात योजनेची माहिती देणारे फलक लावावेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार-प्रचार करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर