व्हॉट््स अॅपवरून विवाहितेस अश्लील छायाचित्रे
By Admin | Updated: March 13, 2015 23:50 IST2015-03-13T23:49:50+5:302015-03-13T23:50:04+5:30
विनयभंगाचा गुन्हा दाखल : दोघांना अटक

व्हॉट््स अॅपवरून विवाहितेस अश्लील छायाचित्रे
इंदिरानगर : व्हॉट््स अॅपद्वारे विवाहितेस अश्लील छायाचित्रे पाठवून त्रास देणाऱ्या दोघा युवकांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे़
पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेस व्हॉट््स अॅपवर मोहम्मद वासीद रोशन अली (२३, तारावली, मुंबई) व मोहम्मद भैराज शौकत अली (२१, रा़ पाथर्डी फाटा) हे दोघे अश्लील संदेश पाठवून त्रास देत होते़ तसेच महिलेने या साईटच्या प्रोफाईलवर अपलोड केलेला फोटोबाबत छेडछाड करून तो अश्लील करून दोघा संशयितांनी तिला पाठविला होता़ या महिलेने ही बाब पतीला सांगताच त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली़ मोहम्मद वासीद रोशन अली व मोहम्मद भैराज शौकत अली या दोघांना अटक केली आहे़ विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)