युवतीची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर

By Admin | Updated: June 14, 2017 00:43 IST2017-06-14T00:43:26+5:302017-06-14T00:43:46+5:30

एकास अटक

The pornographic photograph of the young woman on social media | युवतीची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर

युवतीची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवीस वर्षीय युवतीस विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावून तिची अश्लील छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी संशयित अक्षय श्रीपाद राव (२७ रा. खोडेनगर, आठवण हॉटेलजवळ, इंदिरानगर) यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे़
मूळच्या ठाणे जिल्ह्यातील नौपाडा येथील मात्र सद्यस्थितीत नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या युवतीसोबत संशयित राव याने जुलै २०१६ पासून ओळख वाढवली़ यानंतर तिला विवाहाचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून तिचा विनयभंग केला़ तसेच या युवतीचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करून ब्लॅकमेलिंग सुरू केले़
याबाबत पीडित युवतीने सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित राव विरोधात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली़

Web Title: The pornographic photograph of the young woman on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.