जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदारांची भर
By Admin | Updated: August 1, 2014 01:10 IST2014-07-31T23:20:52+5:302014-08-01T01:10:50+5:30
जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदारांची भर

जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदारांची भर
नाशिक पश्चिम आघाडीवर : अंतिम मतदार यादीनाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्'ातील मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास एक लाख ८६ हजार मतदारांची नव्याने भर पडली आहे. येत्या दोन दिवसांत या मतदार याद्या केंद्रांवर मतदारांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून, मतदारांनी नावे असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील व उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी प्रत्येक विधानसभानिहाय यादी जाहीर केली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरण्यात आली व त्यानंतर नव्याने मतदारांची नोंद झालेली आहे अशा मतदारांची ही अंतिम मतदार यादी असून, मतदार पुनरिक्षण मोहीम व निरंतर मतदान नोंदणी प्रक्रियेत जिल्'ात जवळपास एक लाख ९१ हजार ८९६ मतदारांनी नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर केले
होते.
त्यापैकी एक लाख ८६ हजार ३५३ मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याने जिल्'ातील मतदारांची संख्या आता ४० लाख ६४ हजार ३३८ इतकी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जिल्'ात ३८ लाख ७९ हजार ३७२ इतके मतदार होते. त्यात २० लाख ५५ हजार ४८८ पुरुष व १८ लाख २३ हजार ८३४ महिला मतदारांचा समावेश होता. ५० तृतीयपंथी मतदारांचीही नोंद करण्यात आली.
गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना पुन्हा एकवार नावनोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय मतदार याद्या मतदारांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. साधारणत: विधानसभा निवडणुकीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळू शकतो. (प्रतिनिधी)