रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनाला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:41+5:302021-09-26T04:15:41+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी ते काळुस्ते हा दळणवळनाचा मुख्य रस्ता असून पर्यटनाला पोषक आहे. भाम धरणाकडे जाणाऱ्या ...

Poor road conditions hamper tourism | रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनाला बाधा

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनाला बाधा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी ते काळुस्ते हा दळणवळनाचा मुख्य रस्ता असून पर्यटनाला पोषक आहे. भाम धरणाकडे जाणाऱ्या या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. भाम, भंडारदरा धरणाकडे जाणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांची रांगोळी तयार झाली आहे.

घोटी-काळुस्ते रस्त्याची झालेली दुरवस्था व त्वरित उपाययोजना कराव्यात, हा रस्ता काळुस्ते, भरवज, निरपन, तळोघ, कांचनगाव, मांजरगाव, आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, कुरुंगवाडी, अवचितवाडी, ठाकूरवाडी, बोरवाडी, सारुक्तेवाडी, दरेवाडी अशा गावांना जोडणारा रस्ता असून याची त्वरित दुरुस्ती करून लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका यांनी मागणी करत घोटी-काळुस्ते रस्त्याची झालेली दुरवस्था बघून प्रहार संघटनेने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इगतपुरी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या स्तरावरून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. घोटी-काळुस्ते रस्त्याची दुरुस्ती करून परिसरातील दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर छोटेमोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना कराव्यात व परिसरातील मुख्य रस्ता दुरुस्त करावा. चांगल्या दर्जाचे काम करून भविष्यात रस्त्याचा प्रश्न उद्भवणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, सोपान परदेशी, मंगेश शिंदे, अनिता घारे, चंद्रकांत घारे, ज्ञानेश्वर घारे, नंदू घारे, कैलास घारे, विठ्ठल घारे, गंगाराम पाटील, प्रकाश घारे, योगेश घारे आदींनी मागणी केली. (२५ घोटी रोड)

250921\25nsk_28_25092021_13.jpg

२५ घोटी रोड

Web Title: Poor road conditions hamper tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.