विंचूर-पिंपळस रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:38+5:302021-09-26T04:15:38+5:30
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्ग असलेल्या या मुख्य वर्दळीच्या विंचूर-पिंपळस रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवर ऐन वर्दळीच्या ...

विंचूर-पिंपळस रस्त्याची दुरवस्था
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्ग असलेल्या या मुख्य वर्दळीच्या विंचूर-पिंपळस रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवर ऐन वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यात आदळून वाहनांचा खुळखुळा होत आहेच, सोबतच वाहनावर बसलेल्यांनाही पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद ते नाशिक महामार्गावर असणाऱ्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रुग्णवाहिका चालकांसह इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरील विंचूर ते रामाचे पिंपळसपर्यंत कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
---------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाने निदान खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा (२५ लासलगाव २)
250921\25nsk_25_25092021_13.jpg
२५ लासलगाव २