विंचूर ते लोणजाई गड हे सहा ते सात किलोमीटर चे अंतर आहे. विंचूर ते सुभाषनगरचे अंतर चार किलोमीटर आहे. सुभाषनगरची लोकसंख्या बाराशे ते पंधराशेच्या आसपास आहे, तसेच सुभाषनगर रस्त्यावर असलेेल्या नेवगे वस्ती, जेऊघाले वस्ती, संधान वस्ती व इंदिरानगर येथेही मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. येथील नागरिकांचे विंचूरच्या बाजारपेठेत नियमित येणे-जाणे असते. येथील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी विंचूर विद्यालयात यावे लागते. त्याचप्रमाणे, न्यू ब्लाँसम्स् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना याच रस्त्याने जावे यावे लागते, तर लोणजाई माता मंदिर हे पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत आहे, तसेच येथील निसर्गरम्य वातावरणामुळे लोणजाई गड पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत असल्याने, येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. श्रावण महिन्यात येेथील अरण्येश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा याच रस्त्याने राबता असतो, परंतु खड्ड्यांंमुुुळे चाळण झालेल्या या रस्त्यावर वाहन चालकांंना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावी लागतात.
-----------------
शेतकऱ्यांना खोळंबा
पावसाळ्यात तर परिस्थिती अजूनच बिकट होते. शेतकऱ्यांना आपल्या कृषी मालाची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते. परिसरातील नागरिकांचे दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या या रस्त्याची लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांंनी दखल घेऊन सदर रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. (२७ विंचूर)
270821\27nsk_2_27082021_13.jpg
२७ विंचूर