शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

नांदूरशिंगोटेत शिवार रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:40 PM

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिसरातील शिवार रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देबिकट वाट : चिखलातून मार्ग काढताना शेतकऱ्यांची कसरत

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. परिसरातील शिवार रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्याने चिखलातून वाट काढताना शेतकºयांचे हाल होत आहेत. नांदूरशिंगोटे गावात येणाºया काही रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे; परंतु त्यापुढील रस्त्यांचे मजबुतीकरण झालेले नसल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकºयांनी शेतात पिकविलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने अद्यापही शेतीशिवारात पाणी साचलेले असल्याने वावर उखळून गेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वाड्यावस्त्यांवर राहातात. शिवार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.नांदूरशिंगोटे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, २० ते २५ गावांचे केंद्रबिंदू असल्याने येथे व्यापारी व ग्राहकांची वर्दळ असते. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे येथे उपबाजार आवार असल्याने दर शुक्रवारी व सोमवारी धान्य, भुसार व कांद्याचे लिलाव असतात. त्यामुळे शेतकºयांची गर्दी असते.४शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच बँका व पतसंस्था, आठवडे बाजार, दवाखाना, शेती मॉल असल्याने शेतकरी व नागरिकांची खरेदी-विक्रीसाठी वर्दळ असते. वाडीवस्त्यांंवरील शिवार रस्ते नव्याने झाल्यास गावाच्या विकासात त्याची भर पडेल. आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक