सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:37 IST2020-09-23T22:49:50+5:302020-09-24T01:37:38+5:30
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था
निफाड तालुक्यातील सावरगाव-केदराई माता मंदिर रस्त्यावर असलेल्या नादुरुस्त फरशी पुलावर अडकलेला मालवाहू ट्रक.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
सावरगाव - केदराई रस्त्यावर नदीवरील फरशी पुलाच्या दुरवस्थेमुळे या फरशीवरून होणारी शेतमाल वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारी वजनाची शेतमाल वाहतुकीची वाहने पुलावर अडकत असल्याने हा पूल अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने संबंधित विभागाने याबाबत तात्काळ दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करून उपाययोजना कराव्यात , अशी मागणी सायगाव व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.