इगतपुरीतील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:14 IST2020-08-21T23:22:11+5:302020-08-22T01:14:14+5:30
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे.

इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी निर्मळा गायकवाड यांच्याकडे देताना जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य.
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोदावरी संकुल ते गिरणारा येथे अनेक खड्डे पडलेले आहे. येथे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन देताना किरण फलटणकर, शांतीलाल चांडक, विजय गुप्ता, सुनील आहेर, सागर परदेशी, कृष्णा करवा, कृष्णा परदेशी, अजित पारख आदी उपस्थित होते.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोदावरी संकुल ते गिरणारा येथे अनेक खड्डे पडलेले आहे. येथे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जुना मुंबई-आग्रा महामार्गाचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच या रस्त्याची चाळण झाली आहे.