गिगाव- बोधे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:45+5:302021-06-17T04:10:45+5:30
तालुक्यातील माळमाथा भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झाली आहे. वाहनधारकांना कसरत ...

गिगाव- बोधे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
तालुक्यातील माळमाथा भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झाली आहे. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. मालेगावी रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य पद्धतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी प्रा. हिरालाल नरवाडे, बापू भामरे, समाधान पवार, शिवाजी नजन यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य विष्णू जाधव, शिवदास हिरे, शिवाजी नजन, गोरख भवर, गोकुळ भवर, विजय वाघ, प्रकाश दातीर, कैलास देवरे, बापू भामरे, सीताराम आचट, सागर भवर, खुशाल सूर्यवंशी, मोटू शेवाळे, योगेश शेवाळे आदी सहभागी झाले होते.
इन्फो
ग्रामपंचायती करणार ठराव
लोकप्रतिनिधींनीही रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्याचे काम त्वरित व्हावे, या मागणीसाठी परिसरातील ग्रामपंचायतींनी सामूहिक ठराव करून ठराव शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट...
माळमाथा परिसरातील रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला तोंड द्यावे लागते. शासन- प्रशासनाने त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करावी.
-प्रा. हिरालाल नरवाडे, ग्रा.पं. सदस्य, बोधे