जानोरी -दिंडोरी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:42 IST2021-02-18T21:44:24+5:302021-02-19T01:42:12+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी -मोहाडी- कोराटे- दिंडोरी या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

जानोरी, मोहाडी, कुर्नोली, खडक सुकेणे, जवळके दिंडोरी या गावातील ग्रामस्थांसाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्याने दररोज तालुक्याच्या गावाला शासकीय अथवा अन्य कामांसाठी ग्रामस्थांची वर्दळ सुरु असते. परंतु या रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहन चालविण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तसेच सध्या द्राक्षांचा हंगाम सुरु असल्याने द्राक्ष घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत की काय अशी शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्याची लवकर दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे उपतालुकाप्रमुख मनोज ढिकले, सोमनाथ घुमरे, प्रशांत घुमरे, गोरख घुमरे, शरद पाटील, आर. आर. पाटील आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.