बारागावप्रिंपी-भेंडाळी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:59+5:302021-04-05T04:12:59+5:30

बारागावपिंप्री ते भेंडाळी या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याने जाणे-येणे ही अवघड झाले आहे. हा रस्ता बारागावपिंप्री -पाटपिंप्री-तळेवाडे-महाजनपूर भेंडाळीमार्गे ...

Poor condition of Baragaon Primpi-Bhendali road | बारागावप्रिंपी-भेंडाळी रस्त्याची दुरवस्था

बारागावप्रिंपी-भेंडाळी रस्त्याची दुरवस्था

बारागावपिंप्री ते भेंडाळी या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याने जाणे-येणे ही अवघड झाले आहे. हा रस्ता बारागावपिंप्री -पाटपिंप्री-तळेवाडे-महाजनपूर भेंडाळीमार्गे सायखेडा हा रस्ता जोडला आहे. या मार्गावरील सर्व गावातील विद्यार्थी बारागाव पिंपरी येथे शिक्षणासाठी येतात. बारागावपिंप्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे या गावातील रुग्णांना बारागावपिंप्री येथे यावे लागते. या रस्त्यावरील खडी उघडी झाल्याने रस्त्यात मोठे खड्डे झाले आहे. त्यामुळे बससेवाही बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर झाले असून, वाहन

चालविताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा रस्ता सिन्नर व निफाड या दोन्ही तालुक्यांना जोडणारा असून, तो लवकरात लवकर दुरुस्त करावा. आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर यांनी या रस्त्याचे काम मार्गी लावावे व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी तळवाडेचे सरपंच राजेश सांगळे, सावळीराम उगले, संपत पानसरे, अजिज शेख आदींनी केली आहे.

फोटो ओळी : ०४बारागावपिंप्री१

सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या बारागावप्रिंपी ते भेंडाळी रस्त्याची झालेली दुरवस्था.

===Photopath===

040421\04nsk_19_04042021_13.jpg

===Caption===

सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या बारागावप्रिंपी ते भेंडाळी रस्त्याची झालेली दुरावस्था.

Web Title: Poor condition of Baragaon Primpi-Bhendali road