औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:03 IST2020-09-12T21:39:41+5:302020-09-13T00:03:20+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

वनोली गावाजवळील रत्यावर पडलेले खड्डे.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
या महामार्गावरील औंदाणे व वनोली, विरगाव ढोलबारे आदी गावांजवळ पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे पडली आहेत. अपघातांमुळे या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी अतिशय जवळच अससल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, खड्डे कोणते टाळावे व कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरु स्ती करावी अशी मागणी होत आहे.
विंचुर प्रकाशा महामार्गवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असुन अनेक वाहनधारक जखमी होत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशाना जीव मुठीत धरु न रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे येथे गतिरोधक व दिशादर्शक फलकांसह खड्ड्यांची डागडुजी करण्याची करज आहे.
- वसंत भामरे, माजी पंचायत समिती उपसभापती.