पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

By Admin | Updated: September 13, 2016 01:00 IST2016-09-13T01:00:09+5:302016-09-13T01:00:23+5:30

पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

Pondali ekofrandli Ganesh immersion | पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

 सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे शेतकरी आत्महत्त्येबाबत जनजागृती केली.
विद्यालयात बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे शाळेच्या आवारातच पाण्याने भरलेल्या एका मोठ्या पातेल्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी सविता देशमुख यांनी गणेशपूजनाचे धार्मिक महत्त्व व काळाची गरज याबाबत माहिती दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिस व रासायनिक रंगांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे आर. टी. गिरी यांनी सांगितले. टी. के. रेवगडे, के. डी. गांगुर्डे यांनी शेतकरी आत्महत्त्येसंदर्भात चलचित्र सादर करून बळीराजाच्या व्यथा शेतकऱ्यांसमोर मांडल्या. पर्यावरणास हानी न पोहचवता सण साजरे करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे शेतकरी आत्महत्त्येच्या कारणांवर प्रकाशझोत टाकत जनजागृती
केली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आजचा गणेशोत्सव व तरुण पिढी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बी. आर. चव्हाण, आर. टी. गिरी, एस. एम. कोटकर, मलेका शेख, सी. बी. शिंदे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pondali ekofrandli Ganesh immersion