शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंब बाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:52 IST

चौगाव : दहा लाखांचे नुकसान, १२०० झाहे भक्ष्यस्थानीसटाणा : तालुक्यातील चौगाव येथील शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सोमवारी (२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत माजी सरपंच लताबाई वसंत शेवाळे व भास्कर रतन शेवाळे यांच्या तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बाग पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आठ ते दहा लाख रु ...

चौगाव : दहा लाखांचे नुकसान, १२०० झाहे भक्ष्यस्थानीसटाणा : तालुक्यातील चौगाव येथील शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सोमवारी (२६) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत माजी सरपंच लताबाई वसंत शेवाळे व भास्कर रतन शेवाळे यांच्या तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बाग पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आठ ते दहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. मात्र डाळिंब बागेतील सर्व १२०० झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने शेवाळे कुटुंबियांचे होत्याचे नव्हते झाले असून शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी चौगाव परिसरात भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीवर गेल्या दीड वर्षांपूर्वी सपाटीकरण करून डाळींब बागेची लागवड केली होती. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून बेमोसमी पाऊस, गारपीट व बदलत्या तापमानामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पतीचे निधन झाले असताना माजी सरपंच लताबाई शेवाळे यांनी आपले सोने गहाण ठेऊन सात लाख रु पयांचे कर्ज घेतले होते. या पैशांवर त्यांनी शेतात विहिरीचे खोदकाम करून डाळिंब बाग उभारली.अत्यल्प पावसामुळे बागेस पाणी देणे शक्य व्हावे यासाठी त्यांनी वेळप्रसंगी व्याजाने पैसे उचलले व टँकरने पाणी विकत घेऊन डाळिंब बाग जगविली. दीड वर्षांनंतर आज बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सोमवारी शेवाळे यांच्या नातवंडांची बरे नसल्याने त्यांना कळवण येथे रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीमती शेवाळे त्यांच्यासोबत रु ग्णालयातच होत्या. याचवेळी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारांमध्ये अचानक घर्षण झाल्याने ठिणग्या उडाल्या व त्या खाली असलेल्या डाळिंब बागेवर पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. यावेळी शेतात असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, या आगीत हात व पायाला गंभीर जखमा झाल्या असतानाही त्यांनी आरोळ्या मारून परिसरातील इतर शेतकर्यांना बोलाविण्याचा आटापिटा केला. मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे ३ एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १६०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युत पेटी, वायर या सर्व गोष्टी जळून खाक झाल्या. दरम्यान, आज मंगळवारी रोजी सकाळी तलाठी वाय.जी.पठाण, कृषी सहाय्यक एस.के.पाटील, ग्रामसेवक आर.एच.शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.तालुक्याच्या महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी आण िशेवाळे कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदिकशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक