लासलगावी सोमवारपासून डाळींब लिलाव
By Admin | Updated: July 21, 2016 23:34 IST2016-07-21T23:28:31+5:302016-07-21T23:34:40+5:30
लासलगावी सोमवारपासून डाळींब लिलाव

लासलगावी सोमवारपासून डाळींब लिलाव
लासलगाव : परिसरातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सोमवारपासून (दि.२५) बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर चालू हंगामातील डाळींब शेतमालाचे लिलाव सुरू करणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.
लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळींब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांची मालविक्र ीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे लासलगाव मुख्य बाजार आवारावर मागील दोन वर्षांपासून डाळींब या शेतमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास परिसरातील शेतकरी व व्यापारीवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. (वार्ताहर)