अभिनव बालविकासमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी
By Admin | Updated: October 22, 2016 23:24 IST2016-10-22T23:23:58+5:302016-10-22T23:24:43+5:30
चांदवड : शालेय आवारात रांगोळ्या, पणत्यांची आरास

अभिनव बालविकासमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी
चांदवड : येथील अभिनव बालविकास मंदिरात दिवाळी सण साजरा करण्यात आला. शालेय आवारात रांगोळ्या व पणत्यांची आरास करण्यात आली होती. फुलांच्या तोरणांनी परिसर सजविण्यात आला होता.
यावेळी वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरकचतुर्दशी, भाऊबीज यांची आरास मांडण्यात आली होती. वसुबारसनिमित्त गाय व वासरूचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेखा अहेर यांनी केले. यावेळी सुभाष कोतवाल, गुंजाळ विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. एन. देवरे, मनोहर बनकर, पर्यवेक्षक पगार, सुनील थोरे आदिंसह पालक उपस्थित होेते. मुख्याध्यापक ए. पी. साळुंके यांनी स्वागत केले. (वार्ताहर)