प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची साक्ष होणार

By Admin | Updated: June 25, 2014 00:19 IST2014-06-25T00:08:51+5:302014-06-25T00:19:01+5:30

प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची साक्ष होणार

Pollution control officials will be witness to it | प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची साक्ष होणार

प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांची साक्ष होणार

 

नाशिक : गोदावरी नदीतील प्रदूषण थांबविण्याच्या विषयावरून महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे यांच्या विरुद्ध फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी दाखल एका खटल्यात न्यायालयाने ५ जुलै रोजी साक्षीसाठी बोलविले आहे.
गोदावरी नदीतील प्रदूषण थांबविण्यासाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी रामवाडी येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे यांनी प्रदूषण थांबवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम द्यावा अन्यथा फौजदारी कारवाई करू, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले होते. त्यानुसार फौजदारी खटला दाखल करण्यासाठी राजेश पंडित यांनी याचिका दाखल केली आहे. संजय खंदारे आणि फुलसे यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. त्यावर न्यायालयात सादर पोलिसांच्या अहवालानंतर आज मंचाचे कार्यकर्ते नितीन रूईकर यांची साक्ष घेण्यात आली; परंतु आता तांत्रिक बाजू पडताळण्यासाठी ५ जुलै रोजी फुलसे यांची साक्ष पी. ए. साने यांच्यासमोर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pollution control officials will be witness to it