जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदानजिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदान

By Admin | Updated: September 29, 2015 00:16 IST2015-09-29T00:16:05+5:302015-09-29T00:16:25+5:30

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदान

Polling for six Nagar Panchayats in the district on November 1 for six Nagar Panchayats in the polling district | जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदानजिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदान

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदानजिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी १ नोव्हेंबरला मतदान


नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६७ नवनिर्मित नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीवगळता अन्य सहाही नवीन नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या निवडणुकीची मंगळवारी अधिसूचना जारी करून गुरुवारपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने राजकीय पक्षांची व निवडणूक इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.
जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, निफाड व कळवण या सहा ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले असून, आयोगाच्या सूचनेनुसार गेल्या महिन्यातच प्रभाग रचना व जातनिहाय आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. दिंडोरी ग्रामपंचायतीचेही नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले असले तरी, त्याचा प्रभाग रचना, आरक्षणाचा कार्यक्रम आयोगाकडून उशिरा जाहीर करण्यात आला त्यामुळे येत्या
५ आॅक्टोबर रोजी दिंडोरीची प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने सोमवारी जारी झालेल्या आयोगाच्या निवडणूक यादीत दिंडोरीचा समावेश नाही. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे
१ आॅक्टोबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार असून, दि. २ व ४ रोजीची सार्वजनिक सुटी वगळून ८ आॅक्टोबरपर्यंत नामांकन भरता येईल. ९ रोजी छाननी व १९ रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. १ नोव्हेंबर रोजी मतदान व दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्णातील सहाही नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकेच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Web Title: Polling for six Nagar Panchayats in the district on November 1 for six Nagar Panchayats in the polling district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.