एनडीएसटीसाठी रविवारी मतदान

By Admin | Updated: August 2, 2015 00:22 IST2015-08-02T00:21:23+5:302015-08-02T00:22:04+5:30

चौरंगी लढत : प्रचार तोफा थंडावल्या

Polling for NDST on Sunday | एनडीएसटीसाठी रविवारी मतदान

एनडीएसटीसाठी रविवारी मतदान

नाशिक : नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२) सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात होणार असून, त्यासाठी शहरात पाच, तर जिल्ह्णात एकूण २६ मतदान केंद्रे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाणे यांनी दिली.
सोमवारी (दि.३) स्वामी समर्थ मंगल कार्यालय द्वारका येथे सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच चार पॅनलची निर्मिती होऊन चौरंगी लढत होत आहे. त्यात शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीचे नेते प्रा. प्रकाश सोनवणे व प्रा. पुरुषोत्तम रकिबे यांचे आपलं पॅनल, आमदार अपूर्व हिरे यांचे समर्थ पॅनल फिरोजशहा बादशहा यांचे टीडीएफ तसेच अन्य एक प्रगती अशा चार पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. चौघा पॅनलने भ्रष्टाचार, गुंडगिरी, गद्दारी, अपहार आणि मनमानी या मुद्द्यांचा प्रचारात पुरेपुर वापर केला आहे. जिल्ह्णातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाची समजली जाणारी एनडीएसटी अर्थात माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची मानली जात आहे. आपलं पॅनल, समर्थ पॅनल, प्रगती पॅनल आणि टीडीएफ पॅनल या चार पॅनलमधील ७२ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होणार असून, या निवडणुकीत चार अपक्षही नशीब आजमावत आहेत.
उद्या रविवारी (दि.२) जिल्ह्णात या निवडणुकीसाठी २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी चार ते पाच कर्मचारी याप्रमाणे जिल्ह्णातील २६ मतदान केंद्रांवर १०० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
या २६ मतदान केंद्रांपैकी ५ मतदान केंद्रे नाशिकला तर मालेगावला तीन, कळवण, बागलाण, निफाड, दिंडोरी व येवला तालुक्यांत प्रत्येकी दोेन तर इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, चांदवड, नांदगाव, सुरगाणा, देवळा या तालुक्यांत प्रत्येकी एक अशी २६ मतदान केंद्रे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Polling for NDST on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.