मालेगावी निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:40 IST2019-04-12T17:39:42+5:302019-04-12T17:40:38+5:30
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य व बाह्य मतदार संघातील मतदान केंद्रांची व स्टॉँगरुमची मालेगाव धुळे लोकसभा मतदार ...

मालेगावी निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्य व बाह्य मतदार संघातील मतदान केंद्रांची व स्टॉँगरुमची मालेगाव धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक आचलकुमार सहारिया यांनी शुक्रवारी पाहणी करुन आढावा घेतला. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
२९ एप्रिल रोजी धुळे मतदार संघासाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक सहारिया यांनी मध्य मतदार संघातील एटीटी हायस्कुल, मालेगाव हायस्कुल व तालुका क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज जीमखाना येथील स्ट्रॉँग रुमची पाहणी केली. तसेच मालेगाव बाह्य मतदार संघातील दाभाडी व आघार येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर शौचालय, पिण्याचे पाणी, निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सोयीसुविधा, दिव्यांगासाठी रॅम्प आदींची पाहणी करुन आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या.