------
चौकट==
राजकारणामुळे स्टाफ मिळालाच नाही
या सेंटरसाठी डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी मिळावेत यासाठी संगमनेरे यांनी आरोग्यमंत्री, विभागीय आयुक्त, महापौर, महापालिका आयुक्त आदींना पत्र दिले. एक महिना पाठपुरावा केला. परंतु स्वपक्षीय नगरसेवक व काही कार्यकर्त्यांनी पडद्यामागून विरोध करण्यास सुरुवात केली. मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या रहिवाशांमध्ये हवेमुळे कोरोना पसरतो अशी चर्चा पसरवली. राजकीय कटशहाचे व भाजपमधील गटातटाचे राजकारण आडवे आल्याने महिनाभरापासून तयार असलेले कोरोना विलगीकरण सेंटर सुरू होऊ शकले नाही.
-----------
चौकट
संगमनेरे हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गटाचे व खंदे समर्थक आहे, तर पडद्यामागून विरोध करणारे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या गटाचे असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे अंतर्गत गटातटाचे राजकारण कोरोनाच्या या भयावह परिस्थितीतदेखील सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-----
चौकट
समाजाचे आपण काही देणे लागतो या एकमेव भावनेने मनपाची मदत घेऊन विलगीकरण सेंटर उभारले होते. परंतु कटशहाचे राजकारण व गटातटाच्या कुरघोडीमुळे मोठ्या जड अंतःकरणाने विलगीकरण सेंटर बंद केले.
-विशाल संगमनेरे, भाजप नगरसेवक
(फोटो २९ मंडप)