श्याम बागुलनाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातील पाणी सोडण्यासाठी पंधरा दिवसांपुर्वी सर्वच पक्षांनी एकत्र येवून बांधलेली मोट किती फसवी व सोयाीसोयीची होती हे अखेर धरणातून पाणी सोडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या प्रश्नाची राजकीय सांगड घालत निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची केलेली खेळी जशी गंगापूरचे पाणी वाचवून भाजपाने विरोधी पक्षांवर उलटवली, त्याच प्रमाणात गंगापूरच्या बदल्यात मुकेणेचे पाणी जायकवाडीला सोडल्यामुळे भाजपाचाही पुर्ण विजय या लढ्यात झाला नसल्याचे दिसून आले आहे.दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात टिकेचे धनी व्हावे लागले होते. खुद्द जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची गाडी रोखून त्यांच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांचा यंदा मात्र घसा बसला. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाला एकटे पाडणाºया विरोधी पक्षांवर यंदाच्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात केली व जायकवाडीसाठी पाणी न सोडण्याच्या विरोधातील आंदोलनात सर्व प्रथम फरांदे यांनी उडी घेवून सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मित्रपक्ष शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसेने पुर्ण सहकार्य केले असले तरी, त्यांचे एकत्र येणे हे देखील निव्वळ प्रसिद्धीचा फंडा होता हे त्यानंतरच्या काळातील सरकार व न्यायालयीन लढाईच्या दरम्यान स्पष्ट झाले. फरांदे यांनी न्यायालयीन लढाईत आपली सक्रीयता दर्शविली त्याच बरोबर जलसंपत्ती प्राधिकरण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, जलसंपदामंत्र्यांकडे पाठपुरावा करून गंगापूर धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यावर स्थगिती मिळवून बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांचा पाणी सोडण्याला होणारा विरोध किती तकलादू व दिखावू होता हे स्पष्ट झाले. भाजपाने गंगापूरचे पाणी वाचविले असले तरी, त्या मोबदल्यात मुकणे धरणातून तितकेच पाणी दारणाधरणमार्गे सोडावे लागणार आहे. त्यामुळे गंगापूरचे पाणी वाचवून राजकारणी जिंकले असले तरी, जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणी पाण्याची लढाई हरले आहे.
राजकारणी हरले, राजकारणी जिंकले !
By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 14:24 IST
दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात टिकेचे धनी व्हावे लागले होते.
राजकारणी हरले, राजकारणी जिंकले !
ठळक मुद्देअखेर पाणी सोडावे लागले : सारेच गप्प बसले