बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:36 PM2019-10-06T23:36:39+5:302019-10-06T23:37:22+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी व अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे चुरस निर्माण झाली असून, या अपक्ष व बंडखोरांना उभे करण्यामागे राजकीय पक्षांचाही अप्रत्यक्ष हातभार लागला आहे.

Political parties focus on the rebels | बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष

बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत चुरस : काहींना बसविण्याचे, तर काहींना छुप्या मदतीने रसदा 

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी व अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे चुरस निर्माण झाली असून, या अपक्ष व बंडखोरांना उभे करण्यामागे राजकीय पक्षांचाही अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. सोमवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून काही अपक्ष, बंडखोरांना माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून, काहींनी उमेदवारी कायम ठेवून रिंगणातच राहावे यासाठी छुपी रसद पुरविली जात आहे.
रविवारी दिवसभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या संदर्भातील हालचाली गतिमान झाल्या होत्या. शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसानंतर सर्वच मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले. छाननीनंतर २१२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, त्यातील राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार वगळल्यास अपक्ष व बंडखोरांचीच संख्या अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यामुळे चुरस निर्माण झाली असून, प्रत्येक उमेदवाराला एकेक मताची गरज आहे. अशा परिस्थितीत सामाजिक, जातीय मतांची विभागणी होऊ नये याची काळजी प्रत्येक उमेदवार घेत आहे. त्यामुळे मतांची कमीत कमी फाटाफूट व्हावी असा काहींचा प्रयत्न आहे तर काहींना अपक्ष, बंडखोरांची उमेदवारी पथ्यावर पडणार असल्याने त्यांनी अशा उमेदवारांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसैनिकांची भावना लक्षात घेता, पक्षाने सांगितले तरी थांबायचे नाही अशा मन:स्थितीत इच्छुक असल्याचे जाणवले. तिघांपैकी कोणा एकाला पुढे करून निवडणूक लढविण्यासाठी दिवसभर बैठका व हालचाली सुरू होत्या. नांदगाव मतदारसंघातून माजी आमदार संजय पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पवार यांचे सेना व भाजपशी असलेले संबंध पाहता त्यांची उमेदवारी सेनेला मारक ठरू शकत असल्याने पवार यांनी रिंगणातच राहावे यासाठी राष्टÑवादीकडून प्रयत्न केले जात होते, तर चांदवड-देवळा मतदारसंघातही देवळा तालुक्यातील तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, चांदवडमधून एकच उमेदवार आहे. अशा परिस्थितीत प्रांतवादाचा फटका भाजपला बसू शकतो हे हेरून कॉँग्रेसकडून देवळ्यातील उमेदवारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जात होता. दिंडोरी मतदारसंघाबाबतही अशीच परिस्थिती असून, उमेदवारी न मिळाल्याने सेनेतील नाराजी कायम राहावी यावर राष्टÑवादी लक्ष ठेवून आहे. नाशिक पूर्वमधील राजकीय घडामोडींना वेगनाशिक शहरातील पूर्व मतदारसंघात राष्टÑवादीविरुद्ध भाजप असा सरळ सामना व्हावा यासाठी रविवारी राष्टÑवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले, तर मनसेचे अशोक मुर्तडक यांनाही थांबवून जातीय मतविभागणी रोखण्यासाठी हालचाली करण्यात आल्या आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या तिघा बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याने भाजपची अडचण झाली आहे. बंडखोरांनी थांबावे यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सेनेच्या नेत्यांशी संपर्क सुरू होता.

Web Title: Political parties focus on the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.