शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप: रोहित पवार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 01:30 IST

आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यवाहीला निश्चितपणे सामोरे जातील, असा विश्वासही त्यांनी नाशिक जिल्हा दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमात व्यक्त केला. 

नाशिक : आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यवाहीला निश्चितपणे सामोरे जातील, असा विश्वासही त्यांनी नाशिक जिल्हा दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमात व्यक्त केला. जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे आमदार पवार यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले  विरोधकांकडून समाजमाध्यमांचा वापर हा सरकारवर टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठीच केला जात आहे. लहानसहान विषयाला वेगळे वळण देऊन  समाजमाध्यमांवर त्याचा गवगवा केला जातो. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचे विरोधकांचे प्रयास  असले, तरी ते सफल होऊ दिले जाणार नाहीत, असे ते म्हणाले.       केंद्र शासनाकडून राज्यशासनाला हक्काच्या जीएसटीचा वाटाही दिला जात नसून, केंद्राने अनेकदा शेतकऱ्यांचीही  फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी नमूद केले. आमदार नियुक्तीत विलंबावर आक्षेप राज्यातील आमदारांच्या नियुक्तीबाबत खूपच विलंब होत असून, ही कृती आक्षेपार्ह असल्याची टीका आता सामान्य नागरिकांकडूनही होऊ लागली आहे. देशातील प्रत्येकाने संविधानाचा सन्मान करून, त्याप्रमाणेच पदाचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार