शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय द्वेषापोटी बाजार समितीलाराष्ट्रीय दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:31 IST

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे यांसह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राज्य शासनाने राष्ट्रीय दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असून, सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकीय द्वेषापोटी हा निर्णय घेतल्याची भावना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

पंचवटी : राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे यांसह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राज्य शासनाने राष्ट्रीय दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असून, सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकीय द्वेषापोटी हा निर्णय घेतल्याची भावना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेताना बाजार समिती घटकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोपही संचालकांनी केला आहे.  राज्य शासनाने राज्यातील काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने बाजार समितीतील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होण्याची शक्यता आहे. संचालक बरखास्तीनंतर बाजार समित्यांवर नियंत्रण राहावे यासाठी जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाºयाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. संचालक मंडळ बरखास्त झाले तर संचालकांना बाजार समितीच्या कुठल्याही कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही किंवा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे सर्वतोपरी निर्णय हे शासन नियुक्त अधिकाºयांचे राहतील. त्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले असून, शासनाचा हा निर्णय म्हणजे ठरावीक पक्षाच्या लोकांच्या ताब्यात बाजार समित्या असल्याने त्यांचे खच्चीकरण करणे एवढेच आहे.  शासनाने बाजार समितीतील त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा जरूर करावी; परंतु त्यासाठी बाजार समितीच्या घटकांशी चर्चा करणे गरजेचे होते, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. संचालक मंडळाने काही चुकीचे काम केले किंवा बाजार समितीत गोंधळ केला तर शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करून अशाप्रकारे निर्णय घेणे योग्य आहे; परंतु ज्या बाजार समित्यांनी चांगला कारभार करून उत्पन्न वाढविले त्यांनाच केवळ राजकीय द्वेषापोटी टार्गेट करून सहकार मोडीत काढण्याचा सत्ताधाºयांचा हा प्रयत्न असल्याची टिकाही करण्यात येत आहे.संभ्रमात टाकणारा निर्णयबाजार समिती शासनाला लाखो रुपये कर अदा करते, केवळ मोजक्याच बाजार समित्यांना टार्गेट करण्याचा प्रकार आहे. बाजार समिती घटकांशी चर्चा न करताच सदर निर्णय घेतला असल्याने बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा शासनाचा निर्णय सध्यातरी संभ्रमात टाकणारा आहे.- शिवाजी चुंभळे, सभापती बाजार समितीबाजार समिती घटकांशी चर्चा गरजेचीशासनाने काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा जीआर समजावून घेतल्यानंतर खरे काय ते समजेल. शासनाने बाजार समितीबाबत निर्णय घेताना बाजार समितीच्या घटकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देऊन टार्गेट केले जात आहे.  - संजय तुंगार,  उपसभापती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNashikनाशिक