शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता पाटील परतल्यानंतर राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:55 IST

कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे.

नाशिक : कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, यावरून राजकारण रंगले असून, भाजपाने अशाप्रकारे पृच्छाभ्रमंती करण्याऐवजी प्रशासनाची बैठक घ्यावी त्यात गटनेत्यांना बोलवावे, असा सल्ला विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी दिला आहे.  अभियंता रवींद्र पाटील यांनी कामाच्या अतिताणाचा उल्लेख केल्यानंतर त्यावरून महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच टीका करण्यास प्रारंभ झाला होता. अनेक कर्मचारी संघटनादेखील मुंडे यांच्या विरोधात सरसावल्या होत्या. त्यांना काही राजकीय पक्षांनी पाठबळदेखील दिले होते. दरम्यान, पाटील शुक्रवारी (दि.१) हे सुखरूप घरी पोहोचल्यानंतर महापौर  रंजना भानसी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना धीर दिला.दरम्यान, या घटनेनंतर भाजपातील एका गटाने शुक्रवारी (दि.१) महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन त्यांच्यावर कामाचा ताण आहे का वैगरे विचारणा करून आयुक्ततुकाराम मुंढे यांच्याविरोधातील नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे भाजपातच दोन गट पडल्याचे दिसत आहे. महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना त्याचा कायदेशीर वापर करीत महासभेसारख्या व्यासपीठाचा वापर करून घेण्याऐवजी भाजपाच्या युवा नगरसेवकांनी महापौर व पदाधिकाºयांना टाळून अधिकारी कर्मचाºयांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द दिला. पदाधिकारी प्रशासनावर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने भाजपातील एक गट अशाप्रकारची कृती करीत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे भाजपात आता दोन गट पडल्याचे चित्र आहे. शुक्र वारी (दि. १) सकाळी महापालिकेतील बांधकाम, नगररचना व पाणीपुरवठा विभागात जाऊन मुकेश शहाणे, जगदीश पाटील, अ‍ॅड. श्याम बडोदे, राकेश दोंदे यांनी अधिकारी व कर्मचाºयांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला.भेटीगाठी कशाला, गटनेत्यांची बैठक बोलवाभाजपाच्या नगरसेवकांच्या एका गटाने सुरू केलेल्या या मोहिमेवर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी टीका केली असून अशाप्रकारे दौरे करण्यापेक्षा प्रशासनातील अधिकाºयांची बैठक बोलवा तसेच गटनेत्यांनादेखील विश्वासात घेऊन माहिती घ्या, अन्यथा या भेटीगाठीनेच कर्मचारी अधिक तणावाखाली येतील असा टोला त्यांनी लगावला आहे. कामाच्या तणावामुळे अभियंता बेपत्ता होण्याचे प्रकरण मनपाच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अशा मानसिकतेत असतील तर नाशिक स्मार्ट कसे होईल? असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे. अधिकाºयांचे मनोबल वाढवण्यासह त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करावे, असे सांगत, महापौरांनी याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका