जिल्ह्यात 5.89 लाख बालकांना पोलिओ डोस
By Admin | Updated: April 3, 2017 01:56 IST2017-04-03T01:56:28+5:302017-04-03T01:56:43+5:30
नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत ५ लाख ८९ हजार ४२१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़

जिल्ह्यात 5.89 लाख बालकांना पोलिओ डोस
नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत रविवारी (दि़२) शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख ३५ हजार ६६२ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ५३ हजार ७५९ असे एकूण ५ लाख ८९ हजार ४२१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़
शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व आरोग्य अधिकारी डॉ़ विजय डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात ६८३ बूथ, ४१ ट्रान्झिट टीम, ४० फिरती पथके अशी यंत्रणा उभारण्यात आली होती़ यासाठी २,१६७ कर्मचारी, तर प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), आऱसी़एच़ नोडल आॅफिसर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती़
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३ हजार ६३२ बूथ लावण्यात आले होते़ यासाठी ९ हजार २२१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ ग्रामीण भागात ही मोहीम तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस सुरू राहणार असून, पोलिओचा डोसपासून वंचित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजले जाणार आहेत़