शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:22 IST

शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे.

नाशिक : शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे. भद्रकाली, सातपूर, नाशिकरोड या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांनी सशस्त्र संचलन केले.विघ्नहर्त्या गणरायाचा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शहर पोलीस आयुक्तालय स्तरावर या दहा दिवसांसाठी सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी ‘खाकी’ पुन्हा सरसावली आहे. शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आयुक्तालय हद्दीत करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना स्थानबद्ध किंवा तडीपार करण्यात आले आहे. चार पोलीस उपआयुक्तांसह आठ सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विभागनिहाय बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.१७ पोलीस निरीक्षक, ७८ उपनिरीक्षक, १ हजार ३५४ पोलीस कर्मचारी, ७०३ पुरु ष, २४० महिला गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या ३ तुकड्या (एसआरपीएफ), जलद प्रतिसाद पथकाची १ तुकडी (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पोलिसांची १ तुकडी (आरसीपी), स्ट्रायकिंग फोर्सची १ तुकडी, वज्र वाहन-१, सीसीटीव्ही व्हॅन-१, ५१ जीप असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाहीगणेशोत्सव काळात शहर पोलीस प्रशासन सतर्क असून, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. संशयास्पदरीत्या हालचाली करत गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडविण्याचा प्रयत्न करणाºयांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश नांगरे पाटील यांनी सर्व अधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPoliceपोलिस