पोलीस वाहनाची तोडफोड

By Admin | Updated: December 22, 2015 23:34 IST2015-12-22T23:33:48+5:302015-12-22T23:34:48+5:30

दंगलीचा गुन्हा दाखल : पाच संशयित ताब्यात; पेठरोड वसतिगृहातील घटना

Police vehicle dismantled | पोलीस वाहनाची तोडफोड

पोलीस वाहनाची तोडफोड

पंचवटी : आदिवासी विकास विभागाच्या पेठरोडवरील वसतिगृहात सोमवारी सुरक्षारक्षक व विद्यार्थ्यात झालेल्या वादानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पंचवटी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दगडफेक केल्याची घटना घडली होती.
या घटनेबाबत जेलरोड येथे राहणाऱ्या प्रशांत बाळकृष्ण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसांनी वसतिगृहात दंगल घडवित शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जयराम वाघरे, जगदीश चौधरी, गणेश भोये, निवृत्ती महाले, हिरामण गाडर अशा पाच संशयितांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, पेठरोड परिसरात आदिवासी विकास विभागाचे शारदा व द्वारका नावाचे वसतिगृह असून, या वसतिगृहात विद्यार्थी राहतात. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला एका वसतिगृहातील विद्यार्थ्याने दुसऱ्या वसतिगृहाच्या संरक्षित भिंतीवरून उडी मारली. सदरची घटना सुरक्षारक्षकाने बघितली व त्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्या कानशिलाखाली लगावली. या घटनेनंतर दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थी एकत्र जमा झाले व त्यांच्यात वाद सुरू होताच सुरक्षारक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. त्यानंतर पंचवटी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पंचवटी पोलिसांचे पथक वसतिगृहाच्या आवारात येऊन चौकशी करून कोणाला तक्रार द्यायची आहे त्यांनी वाहनात बसा असे सांगितले व त्यानुसार चार ते पाच विद्यार्थी वाहनात बसले आणि त्याचवेळी जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाने काही कळण्याच्या आत पोलीस वाहनावर (क्र. एम. एच. १५ अ‍ेई ००४७) दगडफेक करून पाठीमागची तसेच खिडकीची काच व अंबर दिवा फोडला त्यानंतर संशयितांनी गृहपाल कार्यालयाच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करून गृहपाल राठोड व फिर्यादी पाटील यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. (वार्ताहर)

Web Title: Police vehicle dismantled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.