शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पोलिसांकडून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2016 00:05 IST

सोमवारी धरणे : जागरूक नाशिककर मंचचा आरोप

नाशिक : शहरातील नागरिक व संघटनांकडून विविध विषयांवर केली जाणारे आंदोलने दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करीत असून, कार्यकर्ते व सामान्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप जागरूक नाशिककर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे़ याविरोधात सोमवारी (दि़१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़पोलिसांच्या या दडपशाहीची पुराव्यासह माहिती मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे पदाधिकारी व आयटकचे राजू देसले, हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत़ एकीकडे गुन्हेगार खुलेआम शहरात फिरत आहेत, तर दुसरीकडे पोलीस सामान्य नागरिकांवर धाक दडपशाही करीत आहेत़ सर्वसामान्यांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी रीतसर पोलीस परवानगीचे पत्र देऊनही त्यास परवानगी मिळत नाही़ यानंतर नियोजनानुसार आंदोलन केल्याने कार्यकर्ते व नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल केल्याचे वास्तव आहे़ तसेच या कार्यकर्त्यांना एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला़ पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात सोमवारी (दि़१५) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)