शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोरच सराईत गुन्हेगाराची तक्रारदारास धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:56 IST

: खून, मारहाण, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे आदींसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व काही दिवसांपूर्वीच खंडणी प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे ऊर्फ तुक्या याने पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात सरकारवाडा पोलिसांसमोर घडली़

नाशिक : खून, मारहाण, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे आदींसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व काही दिवसांपूर्वीच खंडणी प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे ऊर्फ तुक्या याने पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात सरकारवाडा पोलिसांसमोर घडली़पोलीस गाडीतून उतरून तक्रारदाराच्या अंगावर धावून जात धमकी दिल्याचा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात व तोही सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमोर घडल्याने गुन्हेगारांची मजल किती वाढली हे दिसून आले़ विशेष म्हणजे हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रविवार कारंजा भागात हातगाडीचालकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार चोथवेवर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्यास गुरुवारी (दि.२०) अटक करून पंचवटी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. फरार कालावधीत चोथवे याने क्रांतिनगरमधील एका दाबेली विक्रेत्याकडे दोन लाखांची खंडणी मागून धमकी दिली होती. यामुळे संबंधित दाबेली विक्रेत्याने गुरुवारी (दि.२०) पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर त्यास आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले होते.संबंधित दाबेलीचालकाने चोथवेविरोधात तक्रार करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी सरकारवाडा पोलीस चोथवेला नेण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी कोठडीतून चोथवेला बाहेर काढून पोलीस वाहनात बसविले़ यावेळी चोथवेची दाबेली विक्री करणाºया तक्रारदारावर नजर पडताच तुरुंगातून सुटल्यावर तुला गोळ्या घालतो, अशी धमकी देत गाडीतून उतरून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला़सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेवर चार वर्षांपूर्वी उदय कॉलनीत राहणाºया समीर हांडे या युवकाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे़ या निर्णयाविरोधात चोथवेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही अटी-शर्तींवर त्यास जामीन मंजूर करण्यात आला असून, सद्यस्थितीत तो जामिनावर आहे. विशेष म्हणजे त्याने उच्च न्यायालयाच्या अटी-शर्तीचा भंग केला असून, तसा अहवाल पंचवटी पोलीस न्यायालयात सादर करणार असून, जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत़  - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी