शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये ८९ गुन्हेगारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 7:31 PM

८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही

ठळक मुद्दे२६ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई नाकाबंदीदरम्यान ३३६ संशयास्पद वाहने तपासण्यात आलीफरार ११पैकी एकही संशयित हाती लागला नाही

नाशिक : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुर्वसंध्येला मंगळवारी (दि.१८) मध्यरात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यावेळी पोलिसांच्या यादीवरील १२९ सराईत गुन्हेगारांपैकी ८९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तसेच ६२ तडीपार गुंडांचे ठावठिकाणे तपासले असता तेदेखील हद्दीत मिळून आले नाही.शहरात कुठल्याहीप्रकारे सार्वजनिक सण-उत्सवांना गालबोट लागू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिमंडळ-१ व २मध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले. यावेळी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची तपासणी तसेच हॉटेल, लॉज,ढाबे, धर्मशाळा, गुन्हेगारांचे अड्डे, टवाळखोर, ट्रीपलसिट रायडर्स, कागदपत्रे जवळ न बाळगता वाहने चालविणारे, मद्यपी वाहनचालक अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीवर नांदूरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ, गरवारे पॉइंट, एक्स-लो पॉइंट, बडदेनगर, संसरीनाका, शालिमार आदि ठिकाणी चोख नाकाबंदी करण्यात आली. यावेळी नाकाबंदीदरम्यान ३३६ संशयास्पद वाहने तपासण्यात आली. यापैकी २६ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन ५ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर तसेच परिसरात टवाळ्या करणा-या ८४ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. २६ झोपडपट्टयांची तपासणी करण्यात आली. ८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही. या मोहिमेत ४उपायुक्तांसह ७ सहायक आयुक्त, १७निरिक्षक, ३१सहायक निरिक्षक/उपनिरिक्षक, ११७कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPolice Stationपोलीस ठाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील