बोगस मतदारांच्या वाहतुकीचा संशय : पोलीसांनी रोखली जीप
By Admin | Updated: February 21, 2017 11:18 IST2017-02-21T10:08:28+5:302017-02-21T11:18:15+5:30
येथील अंबड परिसरामध्ये जनता विद्यालय या मतदान केंद्रावर एका राजकिय उमेदवाराने चक्क महिंद्र पीकअप जीपमधून
बोगस मतदारांच्या वाहतुकीचा संशय : पोलीसांनी रोखली जीप
नाशिक : येथील अंबड परिसरामध्ये जनता विद्यालय या मतदान केंद्रावर एका राजकिय उमेदवाराने चक्क महिंद्र पीकअप जीपमधून बोगस मतदार मतदान केंद्राच्या आवारात आणल्याची बाब पोलीसांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनातून सर्व नागरिक या ठिकाणी उतरविण्यात आल्या त्यांच्यापैकी एकाकडेही ओळखपत्र नव्हते केवल संबंधित उमेदवारचे छायाचित्र असलेल्या चिठ्ठया होत्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला. यामुळे पोलिसांनी सदर वाहनांसह नागरिकांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. अंबड परिसर देखील संवेदनशील म्हणून ओळखला जातो.