पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात

By Admin | Updated: July 17, 2017 00:15 IST2017-07-16T23:59:35+5:302017-07-17T00:15:52+5:30

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने नाशिकमधील दूधबाजारातून पायी गस्त घालत असताना हवालदार बाळू शंकर खरे यांच्यावर अज्ञात युवकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती

Police suspect suspected of involvement in the attack | पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात

पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने नाशिकमधील दूधबाजारातून पायी गस्त घालत असताना हवालदार बाळू शंकर खरे यांच्यावर अज्ञात युवकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती. या घटनेतील मुख्य संशयिताला बीट मार्शलच्या जोडीने नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून ताब्यात घेतले आहे.
खरे यांच्यावरील हल्ला येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित हल्लेखोराच्या वर्णनाचा बिनतारी संदेश सर्वत्र दिला होता. या संदेशावरून वर्णन लक्षात ठेवत भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक रमेश कोळी, हवालदार सुधीर चव्हाण यांनी नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अनोळखी इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतले. हल्ल्यामधील वर्णनानुसार पोलिसांना या इसमावर संशय आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने हल्ल्याची क बुली दिली आहे. संशयित रमेश जनार्दन जाधव (२९, रा. रायगड) यास अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पाच दिवसानंतरदेखील केवळ वर्णन लक्षात ठेवून संशयित हल्लेखोराला अटक केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस प्रोत्साहनपर जाहीर केले आहे.
...म्हणून पोलिसावर हल्ला
रायगड जिल्ह्यातील तराणी गावामध्ये राहणाऱ्या जाधव याच्या तक्रारीची चौकशी रायगड पोलिसांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे पोलिसांचा राग मनात धरून जाधव याने जुने नाशिकमधील खरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासात प्रथमदर्शनी पुढे आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Police suspect suspected of involvement in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.