शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

समाजासाठी पोलिसांचे आरोग्य उत्तम असावे : जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:39 IST

समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसांना धडे दिले.

नाशिक : समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसांना धडे दिले.पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दीक्षित बोलत होते. यावेळी दीक्षित म्हणाले, जगामध्ये अनेक डाएट प्लॅन आले आहेत. ज्या प्लॅनने तुमचे वजन कमी होते, पोटाचा घेर कमी होतो व तीन महिन्यांच्या सरासरीने मधुमेह व फास्टिंग इन्शुलीन कमी होते, तो डाएट प्लॅन उत्कृष्टच आहे. आम्ही संशोधन करून असाच प्लॅन तयार केला असून, तो कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही वयात सहज पाळू शकते व त्याद्वारे सुदृढ राहू शकते. यामध्ये दिवसभरात ५५ मिनिटांत दोन वेळा जेवावे, ४५ मिनिटं पायी चालण्याचा व्यायाम करावा, मधल्या वेळात भूक लागली तर ताक, ब्लॅक टी, ग्रीन टी, नारळपाणी घेण्यास हरकत नाही. अथवा एखादा टमाटा खाऊ शकता. असा अगदी सोपा डाएट असून, नोंंदणी करून सर्वांनी तो पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना या ताणतणावाच्या स्थितीत आहारशैली व पथ्ये पाळून आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस