महापालिकेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

By Admin | Updated: February 21, 2017 01:20 IST2017-02-21T01:20:15+5:302017-02-21T01:20:28+5:30

पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त : तीन स्वरूपात विभागणी

Police settlement for municipal corporation | महापालिकेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

महापालिकेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ महापालिकेसाठी मंगळवारी (दि़२१) प्रत्यक्ष मतदान होत असून, यासाठी शहरात ५४८ केंद्रे, तर एक हजार ४०८ मतदान केंदे्र आहेत़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या शहरातील मतदान केंद्रांची संवेदनशील, अतिसंवेदनशील व क्रिटिकल या तीन स्वरूपात विभागणी करण्यात आली आहे़  महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत असून, त्यामध्ये शहरातील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर व आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे़ यामध्ये ३२ गावांचा समावेश असून, या ठिकाणी ३२ मतदान केंदे्र व ६७ कार्यालये आहेत़ दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police settlement for municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.