तोतया आमदाराच्या बँक खात्यासह मालमत्तेचा पोलिसांकडून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:18 IST2021-09-05T04:18:57+5:302021-09-05T04:18:57+5:30
लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर करून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत ूउभे करण्याचा आरोप असलेल्या आहेर याने सदर रकमा बँकेत ठेवल्या की त्याची ...

तोतया आमदाराच्या बँक खात्यासह मालमत्तेचा पोलिसांकडून शोध
लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर करून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत ूउभे करण्याचा आरोप असलेल्या आहेर याने सदर रकमा बँकेत ठेवल्या की त्याची मालमत्तेत गुंतवणूक केली यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. आहेर याच्या शिंदवड येथील मूळगावी अल्पशी जमीन आहे. द्राक्ष निर्यातदार तसेच मंत्रालयातून कामे करून देण्याच्या भूलथापांच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव जनमानसावर निर्माण करण्यासाठी महागडी उंची वाहने व रुबाबदार पेहराव याचा वापर तो करीत असल्याची चर्चा आहे. मंत्रालयात व प्रशासकीय कार्यालयात सहजतेने वावर करून कामे करून देण्याची त्याची खासियत असल्याची चर्चा परिसरात आहे. जर तसे होत असेल तर राहुल याला एवढ्या उंचीवर जाण्याचा प्लॅटफॉर्म कोणी उपलब्ध करून दिला, हादेखील तपासाचा भाग असून त्यामागील वास्तवता बाहेर यावी अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, तीन दिवसांच्या मिळालेल्या पोलीस कोठडीच्या कालावधीत यंत्रणेने सखोल तपासाला अग्रक्रम दिला असून त्याचे बँक खाते व मालमत्तेच्या शोधासाठी पथक कार्यरत झाले आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत अधिक तपास करीत आहेत. आहेर याच्याकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास वणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.