पोलीस-आरटीओकडून बसणार चाप

By Admin | Updated: March 23, 2017 23:39 IST2017-03-23T23:38:45+5:302017-03-23T23:39:00+5:30

नाशिक : रिक्षाचालकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडते़ या प्रकारास चाप तसेच वाहनधारकांची शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत़

Police-RTO will be arbitrating | पोलीस-आरटीओकडून बसणार चाप

पोलीस-आरटीओकडून बसणार चाप

 नाशिक : शहराची ओळख ही वाहतूक शिस्तीवरून गणली जाते़ मात्र, शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनधारक तसेच रिक्षाचालकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडते़ या प्रकारास चाप तसेच वाहनधारकांची शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत़ याचाच एक भाग म्हणून वाहतूक नियम व आरटीओच्या नियमांनुसार कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षाचालकांना शहर वाहतूक पोलिसांकडून अधिकृत स्टिकर वाटप केले जात आहे़
शहरातील वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहतूक पोलिसांना प्रादेशिक परिवहन विभागाचेही (आरटीओ) सहकार्य मिळते आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ सिंघल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या आदेशानुसार आरटीओ अधिकारी व शहर पोलीस वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून अधिकृत रिक्षांना स्टिकर दिले जात आहे़ यामुळे शहरातील अनधिकृत रिक्षा त्वरित ओळखता येणार असून, कारवाई करण्यास सोपे होणार आहे़
शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांनी संयुक्तपणे अवैध रिक्षाचालकांविरोधात मोहीम राबवून ३६० विनापरवाना रिक्षा जमा केल्या आहेत़ तसेच परवाना, फिटनेस, लायसन्स असे पूर्तता असणाऱ्या ८८८ रिक्षाचालकांना स्टिकरचे
वाटप करण्यात आले आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
३५८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून ९२ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, कागदोपत्री अपूर्ण असलेल्या १९ रिक्षाचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत़
दरम्यान, आजमितीस नाशिक शहरात एकाच परवान्यावर अधिक रिक्षा, तसेच स्क्रॅप रिक्षा धावत असून त्यांची संख्या सुमारे दहा हजारांहून अधिक असल्याचा आरटीओ व पोलिसांचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police-RTO will be arbitrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.