भद्रकाली, आडगावच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By Admin | Updated: May 19, 2014 00:24 IST2014-05-18T23:30:27+5:302014-05-19T00:24:27+5:30

नाशिक : भद्रकाली व आडगाव परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून १७ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ जुने नाशिक परिसरातील जहांगीरवाडा हरिनगरी येथील बंद घरात संशयित दिनकर दत्तात्रय शिर्के आणि इतर अकरा हे शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्त्यावर पैसे लावून कल्याण नावाचा हारजितीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून शिर्के व इतर अकरा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सात हजार ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून या बाराही जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे़

Police raids on gambling bases of Bhadrakali, Adgaon | भद्रकाली, आडगावच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

भद्रकाली, आडगावच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

नाशिक : भद्रकाली व आडगाव परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून १७ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ जुने नाशिक परिसरातील जहांगीरवाडा हरिनगरी येथील बंद घरात संशयित दिनकर दत्तात्रय शिर्के आणि इतर अकरा हे शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्त्यावर पैसे लावून कल्याण नावाचा हारजितीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून शिर्के व इतर अकरा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सात हजार ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून या बाराही जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे़
दुसरा छापा आडगाव पोलिसांनी मारला असून, पाच जुगार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ आडगाव शिवारातील कदम गल्ली परिसरात संशयित संपत भास्कर पाटील व इतर चौघे तीन पत्तीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलीस नाईक शेख यांनी छापा मारून या चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १२ हजार ४३५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत. शेख यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार पाटीलसह चौघांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police raids on gambling bases of Bhadrakali, Adgaon