चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By Admin | Updated: February 2, 2017 01:29 IST2017-02-02T01:29:09+5:302017-02-02T01:29:23+5:30

कारवाई : १७ जणांना अटक; दहा हजार जप्त

Police raids on four gambling bases | चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

नाशिक : शहरातील आडगाव, सातपूर, भद्रकाली व अंबड परिसरातील चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि़ ३०) सायंकाळी छापा टाकून १७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दहा हजारांहून अधिक रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
अंबड परिसरातील दातीरनगरच्या मारुती संकुल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळत असलेले संशयित खंडू बहिरू दातीर यांच्यासह आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील आठ हजार ९४० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले़ याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने नाशिक परिसरातील शितळादेवी मार्गावरील अमरधाम पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणारे संशयित बाळू गवळी व त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून सहा हजार ७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावरील मेडिकल कॉलेज चौफुलीजवळील एका हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर आडगाव पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणारे संशयित अनिल महालेसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police raids on four gambling bases