महात्मानगरमधील अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: March 12, 2017 22:44 IST2017-03-12T22:44:57+5:302017-03-12T22:44:57+5:30

दोन महिलांची सुटका ; एका संशयितास अटक

Police raid on unethical business in Mahatmanagar | महात्मानगरमधील अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा

महात्मानगरमधील अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा

नाशिक : महात्मानगरच्या उच्चभ्रू वसाहतीतील एका रो-हाउसमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर रविवारी (दि़१२) रात्री पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली़ याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती़
महात्मानगर परिसरातील एका रो-हाउसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ व गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांना मिळाली होती़ त्यानुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलिसांनी या ठिकाणी एक गिऱ्हाईक पाठवून खात्री केली़ त्यानुसार दोन महिलांना या ठिकाणी देहविक्रय करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले़
पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Police raid on unethical business in Mahatmanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.