लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा
By Admin | Updated: June 30, 2017 23:52 IST2017-06-30T23:52:38+5:302017-06-30T23:52:38+5:30
शुभलक्ष्मी लॉटरी सेंटर ; ६६ हजार रुपयांचा ऐवज जप्त
लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉटरी सेंटरच्या नावाखाली मटका व जुगार सुरू असलेल्या ठाकरे रोडवरील शुभलक्ष्मी लॉटरी सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी (दि़ ३०) छापा टाकला़ या छाप्यात लॉटरी सेंटरच्या दोन संचालकांसह ११ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २६ हजार रुपयांची रोकड व ४० हजारांचे साहित्य असा ६६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
शुभलक्ष्मी लॉटरी सेंटरमध्ये लॉटरीच्या नावाखाली मटका व जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्तलक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक जाधव, रोहकले, महिला सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक जोनवाल, भद्रकाली व सरकारवाडा पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी लॉटरीचालक संशयित चेतन शेलार व शेट्टी हे ग्राहकांकडून मटका व जुगारीवर पैसे लावून घेत होते़
या प्रकरणी पोलिसांनी चेतन शेलार व शेट्टीसह ११ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे़